झेड सिक्युरिटी असताना किरीट सोमय्या गायब व्हायला काय ‘मिस्टर इंडिया’ आहेत का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गायब व्हायला ‘मिस्टर इंडिया’ आहेत का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे किरीट सोमय्या आज स्वतः नॉटरिचेबल आहेत हीच मोठी आश्चर्याची बाब आहे असेही तपासे म्हणाले.किरीट सोमय्या गायब झाल्यामुळे त्यांनी निश्चितच युद्धनौका ‘विक्रांत’च्या नावाने गोळा केलेले पैशांची अफरातफर केली ही शंका आता जनतेच्या मनात घर करून गेली आहे असा टोलाही तपासे यांनी लगावला आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फोननंतर…मनसेच्या वसंत मोरेंचं अखेर ठरलं !
Next articleविद्यार्थांना खुशखबर : २ मे पासून उन्हाळी सुट्टी ; १३ जूनपासून शाळा सुरू होणार