अंबाबाई…पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे,संपूर्ण पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईन !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या चरणी एक साकडं घातलं आहे.राज्यात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे.संपूर्ण पक्ष घेऊन तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येईल, असा नवस त्यांनी केला आहे.

राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी एकदा संधी आली असतानाही राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होवू शकला नाही. मात्र या पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे. संपूर्ण पक्ष घेऊन तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येईल,असा नवस राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तुळजापूरच्या तुळजाभवानीला केला आहे.यंदा राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि महागाईपासून जनतेला दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळू दे, असे साकडं देखिल त्यांनी तुळजाभवानी चरणी घातले.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काल रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.त्यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांनी तुळजा भवानीमातेच्या चरणी नवस बोलला.यापूर्वी राज्यात राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून येवूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले होते.राज्यात अजून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही. दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढते आहे.पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे.अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिसा सुळे म्हणाल्या.

Previous articleमहाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने मविआचे चारही उमेदवार विजयी होतील
Next articleसांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘सावळ्या’ गोंधळामुळे मंत्र्यांना व्यक्त करावी लागली ‘ दिलगिरी’