मुंबई नगरी टीम
मुंबई । अडीच वर्षानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर काल राज्यात शिंदे सरकार आले असून,राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांच्या रूपाने राज्याला सातारकर म्हणून चौथे मुख्यमंत्री लाभले आहे.स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली असून त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.
स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतल्यानंतर या दोन नेत्यांनी राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला चौथे सातारकर मुख्यमंत्री मिळाले आहे.यापूर्वी सातारा जिल्ह्यातील स्व. यशवंतराव चव्हाण,बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.स्व.यशवंतराव चव्हाण,बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर सातारकर म्हणून राज्याला अजून एक मुख्यमंत्री लाभले आहेत.एकनाथ शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आहिर येथे झाला तर दरे तालुका जावळी हे त्यांचे मुळ गाव आहे.मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.स्व.यशवंतराव चव्हाण,बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे असे ट्विट पवार यांनी केले आहे.