अखेर ‘त्या’ विधानवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चुक झाल्याचे केले मान्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते.त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसने या विरोधात आंदोलन करण्यात आल्यानंतर अखेर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चुक मान्य करीत माफी मागितली आहे.

मुंबई,ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते.त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यपालांवर हल्लाबोल केला होता.शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॅांग्रेस पक्षाने राज्यपालांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभर आंदोलन केले होते.या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले होते.महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचे त्यांनी या स्पष्टीकरणात म्हटले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या मताशी असहमत असल्याचे म्हटले होते.राज्यपालांच्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चुक मान्य केली आहे.

मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे.विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.परंतु,भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Previous articleझोपी गेलेल्या ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही : नाना पटोले
Next articleबुधवारी ठरणार शिंदे सरकारचे भवितव्य,त्यानंतरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार