ज्यांच्या डोक्यात हवा आहे,त्यांना सांगतो ‘निर्घृणपणे’ वागू नका..काळ बदलतो !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो.पण डोक्यात सत्तेची हवा नव्हती.मी जाऊ दिली नाही.सर्व गोष्टी येतात आणि जातात.पण लोकांशी नम्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे.आज ज्यांच्या डोक्यात हवा आहे. त्यांना सांगतो निर्घृणपणे वागू नका.दिवस आणि काळ सर्वांसाठी चांगला नसतो.काळ बदलतो, तो काळ बदलल्यावर आपण जसे लोकांशी वागलो तर तो बदललेला काळ तुमच्याशी जास्त दृष्टपणाने वागू शकतो अशा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा समाचार घेतला आहे.नड्डा यांनी पक्ष संपतील असे वक्तव्य केले होते.म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची.हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची.राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचे कारस्थान भेसूर असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.देशाला अनुशासन पाहिजे होते म्हणून शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता.त्यावेळी त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचे ऐक्य अवलंबून नसते असे सांगून,अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकत्र आले पाहिजे.जनतेनेही एकत्र आले पाहिजे. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.ठाकरे यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल केला.भाजपचा वंश कुठून सुरू होतो हे पाहावे लागेल.दिवस सारखे राहत नाहीत.दिवस येतात आणि जातात.काळ सारखाच राहत नाही.नंतर जे लोक येतील ते तुमच्यासारखेच वागले तर काय होईल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजप सोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही.कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले आहेत आणि जे संपले नाहीत ते संपतील.फक्त आपणच टिकणार हे नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.महाराष्ट्रात शिवसेना संपणार आहे,असे नड्डा म्हणाले आहेत. त्यांनी हे करूनच पाहावे.राजकारण म्हटले की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतात.आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही, बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात. दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशाराही त्यांनी दिला.संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे.ते माझे जुने मित्र आहेत. मी आज त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांचा गुन्हा काय आहे ? ते पत्रकार,शिवसैनिक आणि निर्भिडही आहेत.जे पटत नाही ते बोलतात.मरण आले तरी शरण जाणार नाही, हे त्याचे आहे.ते शरण जाऊ शकले असते.जे शरण गेले, हमाममध्ये आंघोळीला गेले, तसे संजय राऊत गेले असते.पण ते गेले नाही. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे, तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात.फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, असेही ठाकरे म्हणाले.

Previous articleबुधवारी ठरणार शिंदे सरकारचे भवितव्य,त्यानंतरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
Next articleमंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ खुर्च्या असतात,उद्या ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक !