मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत.
मराठा समाजाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता.या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम.जी.एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना अपघाताची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते,असा दावा मेटे यांचे बाळासाहेब चव्हाण यांनी केला आहे. तसेच चव्हाण चालक एकनाथ कदम याच्यावरही संशय व्यक्त केला आहे.आज पुण्यात बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.