लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Previous articleआता पोलिसांना वर्षातून २० दिवस नैमित्तिक रजा मिळणार
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय