दसरा मेळाव्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले “लक्ष्य”

मुंबई नगरी टीम

पुणे । शिवसेना आणि शिंदे गटाच्या होणा-या दसरा मेळाव्यावरून आरोपप्रत्यारेपाच्या फैरी झडत आहे.दोन्ही गटांकडून पोस्टरच्या माध्यमातून वार प्रतिवार केले जात आहे.याच वादात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे.दसरा मेळाव्यामुळे मर्यादा ओलांडून राजकारण सुरू असून ते राज्याच्या हिताचे नसल्याचे नसल्याचे सांगून,संघर्ष होतो,पण त्याला एक मर्यादा घातली पाहिजे.मर्यादा ओलांडली गेली नाही पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर आपले मत मांडले.दुर्दैवाने एकाच पक्षाचे दोन भाग झाले असल्यामुळे या दोन्ही पक्षात स्पर्धा सुरू झाली.संघर्ष होतात पण त्यालाही काही मर्यादा असतात.मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही’, असे शरद पवार म्हणाले.राज्य कारभार चालवणा-या लोकांनी वातावरण दुरूस्त करण्यासाठी पावले टाकायला हवी.पावले टाकायची जबाबदारी आमच्या सारखी ज्येष्ठ लोक असतील, त्याही पेक्षा महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच राज्यात कटूता वाढणार नाही अशी मांडणी केली जावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : राज्यभर ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार
Next articleमी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे ! पंकजा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल