मुंबई नगरी टीम
बीड । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे.”मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे.भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे.वेळेवर पोहोचा,सुरक्षित पोहोचा “असे आवाहन त्यांनी तमाम भगवान भक्तगण आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
आपला दसरा आपली परंपरा !!#AaplaDasraAapliParamparahttps://t.co/CwbNDOBIDb pic.twitter.com/xgOl6hJBjz
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 3, 2022
या व्हिडिओत पंकजा मुंडे म्हटले आहे,आपला दसरा,आपली परंपरा,कष्टकऱ्यांचा हा दसरा,डोंगरदऱ्यात, कडयाकपारीत राहणाऱ्यांचा हा दसरा,भगवानबाबांची भक्ती आणि एकजुटीची शक्ती,आपले पावले आपोआप सावरगांवकडे वळतात. भगवान भक्तीगडावर दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनासाठी आपण आतुर होतो. येथे पिण्याचे पाणी आहे का ? जेवणाची सोय आहे का ? रस्ता तिथपर्यंत जातो का? गाडी कुठे थांबवावी लागेल? किती चालावं लागेल,या सगळ्या चिंता आपल्या मनात जराही घर करत नाहीत कारण आपण वाट पहात असतो ती आपल्या सर्व लोकांच्या एकत्र येऊन सिमोल्लंघन करण्याची,खूप काही मनात असतं,तिथं जाऊन कुणी बोलतं..कुणी नाही बोलत..पण उर्जा मात्र नक्की घेऊन जातं. आपल्या भक्तीची आणि शक्तीची परंपरा,अशीच उज्ज्वल राखण्याची. आपल्या सगळ्यांच्या ओढीने मी पण तिथे येत आहे. भगवान बाबांचे आशीर्वाद आणि तुमच्या प्रचंड घोषणांमधून मिळणारी उर्जा वर्षभर पुरते, मलाही आणि तुम्हालाही.मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे..तुमच्या प्रतिक्षेत राहिल…जरूर या..५ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तीगड सावरगांव येथे..वेळेवर पोहोचा..सुरक्षित पोहोचा..असे आवाहन पंकजा मुंडे केले आहे.