ढाल तलवार मिळाल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…मराठमोळी निशाणी आता परफेक्ट काम झालयं

मुंबई नगरी टीम

मुंबई । अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे.ढाल तलवार ही निशाणी मराठमोळी असल्याने आता परफेक्ट काम झालेले आहे. ढाल-तलावर ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी असून, ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आज शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे.ढाल तलवार ही निशाणी मिळाल्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर ढाल तलवार ही निशाणी मराठीमोळी असून,आता परफेक्ट काम झालेले आहे.ढाल-तलावर ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे, त्यामुळे ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे चिन्ह मिळाल्यानंतर दिली.निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.आम्ही तळपता सूर्य या चिन्हाला प्राधान्य दिले होते, परंतु ते आम्हाला मिळाले नाही.त्यांनी दिलेले ढाल तलवार हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे तो मान्य आहे.ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे.आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.ढाल तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी ट्वीट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.“आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार., सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल,दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार.बाळासाहेबांची शिवसेना. निशाणी : ढाल-तलवार.” असे मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Previous articleपंजाच्या पकडीतील ‘मशाल’ महाराष्ट्र स्वीकारणार नाही : बावनकुळे यांची खरमरीत टीका
Next articleभाजपची ‘ढाल’ आणि ‘गद्दारीची’ तलवार : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सडकून टीका