मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे उपस्थित होते.चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ असे यावेळी नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.