“कर नाही त्याला डर कशाला” ? घाबरून पक्ष सोडणा-यांना मोठा धडा : उध्दव ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरिक्षणे नोंदवली आहेत.त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत,हे जगजाहीर झाले आहे,अशी टीका करतानाच कर नाही त्याला डर कशाला,घाबरून पक्षातून गेलेल्यांना हा मोठा धडा आहे असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जावून ठाकरे कुटूंबाची भेट घेतली.त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.आमदार आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

जामीनावर सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.केंद्र सरकार न्याय देवतेलाही स्वत:च्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.न्याय यंत्रणा ही सर्वसामान्यांच्या आशेचा किरण असते.केंद्र सरकार न्यायालयालाच स्वत:च्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर देशातील जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे.न्यायालयाने दणका देऊनही संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.न्यायालयाच्या चपराकीची लाच वाटण्याइतके केंद्र सरकार संवेदनशील असते, तर अशा घटना घडल्या नसत्या असेही ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या धाडसाचे कौतुक केले. संकटाच्या काळात न डगमगता लढतो, तोच खरा मित्र.तसा संजय राऊत लढणारा मित्र आहे अशी स्तुतीही त्यांनी यावेळी केली.तपास यंत्रणा केंद्राच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत.पक्ष फोडले जात आहेत. खोटया केसेस दाखल केल्या जात आहेत असे सांगून कर नाही त्याला डर कशाला, घाबरून पक्षातून जे गेलेत त्यांच्यासाठी हा मोठा धडा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मी तुरूंगात असताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या कुटूंबाची काळजी घतेली.आमच्या शिवसेनेसाठी मी १० वेळा तुरूंगात जायला तयार आहे.पक्षाशी बेईमानी करणे पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणार असे सांगून त्यांनी बंडखोर आमदारांवर निशामा साधला. तुरूंगात असताना असताना तेथिल कैदी आणि कर्मचारी यांच्या समस्या पाहिल्या त्यासाठी मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगून,सध्या फडणवीस हे राज्य चालवत आहेत.बाकीचे गुंडाळतात असे नाव न घेता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.सध्या देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राऊत म्हणाले.राजकारणातील कटूता मिटवलीच पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार नोक-या हिरावल्या
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह देश विदेशातील नागरिक भारत जोडो यात्रेत सहभागी