मुंबई नगरी टीम
बीड । दरवर्षी दसरा मेळाव्याचं निमंत्रण देता..आताही मिळालयं,मी येत आहे, आपल्या दस-या साठी,माझी भक्ती आणि तुमची शक्ती तिथे आपल्याला यायला भागच पाडेल. २४ ऑक्टोबरला भेटूयात, आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोलंघनासाठी…! भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा सावरगांवच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी झाला आहे.
“आपला दसरा, आपली परंपरा”
भगवानभक्तीगड,
मंगळवार, दि.२४ ऑक्टोबर २०२३.Official YouTube Channel Link ;https://t.co/Bl1X3uFwzC#AaplaDasara #AapliParampara #BhagwanBhaktigad #Sawargav #आपला_दसरा_आपली_परंपरा
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 16, 2023
हा व्हिडिओ पंकजा मुंडे यांच्या अधिकृत यूट्युबवर जारी झाला असून त्यात त्यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. पंकजाताईंनी म्हटलं आहे की, मेळाव्याला यायला तुम्ही चारचाकी घेता, दोन चाकी घेता, सायकल घेता, बैलगाडी घेता, नाही तर रान तुडवत येता.. पण येताच,लेकरांचा हात धरता,कोणाला काखेवर घेता, बायाबापड्या निघता, म्हातारे कोतारे माणसं, तरुण पोरं सगळे निघता… दसर्याला सर्वांची पावले वळतात ती भगवान भक्तीगड सावरगावकडे.. ही दसर्याची परंपरा तुम्हीच निर्माण केली. तुम्हीच याला जन्म दिला, याला मोठं केलं, आणि याची शक्ती वरचेवर वाढवली. प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त लोकं, जास्त उत्साह, जास्त प्रेम, जास्त शक्ती केवढं मोठं भाग्य आहे. मलाही निमंत्रण देता.. आताही मिळालयं, मी येत आहे आपल्या दस-यासाठी माझी भक्ती आणि तुमची शक्ती तिथे आपल्याला यायला भागच पाडेल.२४ ऑक्टोबरला भेटूयात, आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोलंघनासाठी…!