मुंबई नगरी टीम
मुंबई । जिनिव्हास्थित इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरने मणिपूरमधील हिंसाचारानंतर सर्वाधिक विस्थापन झाल्याचे म्हटले असून २०१८ पासून भारतातील संघर्ष आणि हिंसाचारामुळे देखील एवढे विस्थापन झाले नव्हते.कदाचित, तुम्ही ही “सुपरपॉवर” वापरली नसेल.कारण, तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी गुजरात आणि मणिपूरमधील हत्याकांडाला पाठबळ देऊन ते घडवून आणले आहे असे म्हणत इतना ज्यादा झूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! कोई नहीं, आप बोलते जाइए, हम लपेटते जाते हैं ! असा निशाणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला आहे.
What happened to this "superpower" in the 2023 Manipur Violence?
What happened to this "superpower" in the 2002 Gujarat Riots?
The Geneva-based Internal Displacement Monitoring Centre (IDMC) termed the violence in Manipur the highest number of displacements (67,000; 97% of… https://t.co/M13J4tJU3Y pic.twitter.com/FcoYgEsn5p
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 17, 2024
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला आहे.जिनिव्हास्थित इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरने मणिपूरमधील हिंसाचारानंतर सर्वाधिक विस्थापन झाल्याचे (६७०००; २०२३ मध्ये दक्षिण आशियातील एकूण विस्थापनांपैकी ९७%) म्हटले असून २०१८ पासून भारतातील संघर्ष आणि हिंसाचारामुळे देखील एवढे विस्थापन झाले नव्हते. कदाचित, तुम्ही ही “सुपरपॉवर” वापरली नसेल कारण, तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी गुजरात आणि मणिपूरमधील हत्याकांडाला पाठबळ देऊन ते घडवून आणले.आपल्याकडे खरोखरच इतकी प्रभावी “सुपरपॉवर” आहे, तर मग भारत आणि मालदीवमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध वाचविण्यासाठी तुम्ही त्याचा वापर का केला नाही ? चीनला आपली जमीन बळकावण्यापासून रोखण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला जात नाही ? असे प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केले.
आपल्याकडे खरोखरच इतकी प्रभावी “सुपरपॉवर” आहे तर मग भारत आणि मालदीवमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध वाचविण्यासाठी तुम्ही त्याचा वापर का केला नाही ? चीनला आपली जमीन बळकावण्यापासून रोखण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला जात नाही? असे प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, स्प्रिंग रिव्हॅाल्यूशनला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या शेजारील म्यानमारमध्ये ४००० हून अधिक निदर्शकांच्या हत्या थांबवण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला गेला नाही? इस्रायल-हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंधकांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करून हजारो जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुपरपॉवरचा वापर का केला नाही ? असा सवाल करून इतना ज्यादा झूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! कोई नहीं, आप बोलते जाइए, हम लपेटते जाते हैं ! असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.