“रद्द करा  रद्द करा” नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करा

“रद्द करा  रद्द करा” नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करा

शिवसेना आक्रमक

नागपूर : नाणार येथिल प्रस्तावित वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत स्पष्टीकरण देत असताना शांत बसण्याची भूमिका घेणा-या शिवसेनेने आज या प्रश्नी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,राजन साळवी आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी तर राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.या गोंधळामुळे प्रथम तीन वेळा तर चौथ्यावेळी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

नाणार प्रकल्पाविरोधात नाणारवासीय आज नागपुर मध्ये मोर्चा काढला होता. हा मोर्चा अडविण्यात आल्यानंतर आले आहेत. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाँईट ऑफ इन्फर्मेशन नुसार यावर बोलण्याची परवानगी मागितली. मात्र अध्यक्षांनी ती फेटाळल्यामुळे शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. रद्द करा  रद्द करा नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत शिवसेना आमदारांनी सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर काॅग्रेसचे आमदार आमदार नितेश राणे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राजन साळवी यांनी थेट राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून, या प्रकरणी निलंब केले तरी हरकत नाही अशी भूमिका माध्यमांशी मांडली.आज नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी हजारोच्या संख्येने स्थानिक नागपूरात आले आहेत त्याच्या व्यथा मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला असे सांगत आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला असे आ.सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Previous articleमुंबईतील मुसळधार पावसातील अपादग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत करा
Next articleनाणारबाबत प्रामाणिक असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे