मुंबई नगरी टीम
मुंबई: माजी खासदार निलेश राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखीच भडकले आहे.शिवसेनाप्रमुखांवर आरोप केल्यावर शिवसैनिकांनी निलेश राणे यांचे पुतळे जाळले.त्यानंतर आज निलेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारला दिलेल्या परवानगीच्या निमित्ताने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करताना छोटा पेंग्विन आता खुश असेल, असे खोचक ट्विट केले आहे.
राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,छोटा पेंग्विन आता खुश असेल.त्याच्या मुंबई नाईट लाईफची मागणी त्यांनी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्सबार चालू झाले.मुंबईत नाईट लाईफसाठी आदित्य ठाकरे आग्रही असून त्यांनी सातत्यानेत्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यातच काल सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार सुरू करण्याची परवानगी दिलीच पण राज्य सरकारने घातलेल्या अटीही शिथिल केल्या.म्हणून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. बेस्ट संपाचे स्क्रिप्ट शशांक राव यांना दुसऱ्चाच कुणी लिहून दिले होते,असा आरोप अनिल परब यांनी केला होता. त्यावर निलेश राणे यांनी स्क्रिप्ट लिहायचे काम संजय राऊत यांचे आहे.स्वत:कडून प्रश्न सुटत नाहीत आणि दुसऱ्याकडून सोडवले की सहन होत नाही.याला चिंधीगिरी म्हणतात,असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.