मुंबई नगरी टीम
अहमनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संघाचे एजंट आहेत.तसेच त्यांनी आपल्याकडे वकिलांवर झालेला खर्च मागितला,अशी विधाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करून अण्णांचा रोष ओढवून घेतला. यामुळे पक्षाचे नुकसान होणार आहे हेओळखून आज ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अण्णांची माफी मागितली.
अजित पवार म्हणाले की,नवाब मलिक यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नाही.यामुळे हजारे दुखवले गेले असून मी दिलगिरी व्यक्त करतो.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी अण्णा संघाचे एजंट असून त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले,असा आरोप केला होता.त्यांच्या या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया नगरमध्ये उमटल्या.अण्णांनीही या प्रकरणी वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली.अजित पवार म्हणाले की,आमचे सरकार असतानाही अण्णांनी आंदोलने केली होती.पण आम्ही दखल घेतली होती.हे सरकार दखलही घेत नाही.