अनोखे “गोवा फेस्टीवल २०१९” खारमध्ये रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस होणार आहे. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणाऱ्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने दर वर्षी गोवा फेस्टीवलचे आयोजन आम्ही गोयंकार आणि खार जिमखाना यांच्या सयुंक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या दोन दिवसाच्या महोत्सवात विविध स्टॉल्स असून हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यत खुले राहणार आहेत यामध्ये रसिकांना विविध स्पर्धा,प्रश्नमंजुषा, चर्चासत्र, मनोरंजन,संगीत,खमंग गोवन खाद्यपदार्थ, गोवन उत्पादनांच्या प्रदर्शनासह गोवन वस्तू खरेदी करण्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.महोत्सवेच उदघाटन ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

या गोवा फेस्टिवलमध्ये ९ फेब्रुवारी म्हणजेच पहिल्या दिवशी गोवा थीमवर आधारित पाककला स्पर्धा,फ्लॉवर आरंजमेंट स्पर्धा,विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच १० फेब्रुवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “सुरमनी” गायन स्पर्धा,”सरगम” संगीत वाद्यवादन स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेता महेश कोठारे तसेच स्वागत समारंभासाठी संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सायंकाळी वैशाली आणि शर्मिला ग्रुपचा बॉलीवूड जल्लोष ऑर्केस्ट्रा या संध्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे. गोवा महोत्सवाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी करण्यात येईल.

गोवा महोत्सवाचे आकर्षण तेथील विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहे. रसिकांना मुंबईत राहून थेट गोव्यात असल्याचा आनंद या महोत्सावातील वैशिष्टयपूर्ण गोवन कलाकुसरी पाहिल्यावर आणि खरेदी केल्यावर मिळणार आहे. तसेच खाद्यप्रेमींसाठी गोव्याचे प्रसिद्ध असलेले माश्याचे विविध प्रकाराच्या पाककृतीच्या चवीचा आस्वादही रसिकांना येथे मिळणार आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी !  अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
Next articleमाजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपात प्रवेश