राम मंदिर बनाना नही सत्ता बनानी हैं : भुजबळ

राम मंदिर बनाना नही सत्ता बनानी हैं : भुजबळ

मुंबई नगरी टीम

नाशिक : वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आता वाघाचा मुका घेत असून देशात जनतेपासून दूर गेलेल्या भाजप शिवसेना पक्षाला एकएकटे लढून सत्ता मिळणार नाही त्यामुळे भाजप शिवसेना एकत्र झाले आहे. भाजपला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा प्रश्न बाहेर काढून धर्मात धर्मात लढाई निर्माण करण्याचा डाव असून भाजपला ‘राम मंदिर बनाना नही, सत्ता बनानी हैं अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

एकीकडे देशात दहशतवादी वादी हल्ला झाला असताना भाजपचे नेते मात्र निवडणूकीच्या प्रचारासाठी सभा घेत होते. समोर जवानांच्या शव पेट्या असतांना सत्ताधारी नेते मात्र हसत होते. देशात दुःखद घटना घडल्यानंतरही राज्यकर्ते अशी भूमिका घेतात ही दुर्दैवी बाब आहे. या सत्ताधाऱ्यांना सोयरे सुतक नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या निवडणुकीत जर भाजप पायउतार झाले नाही तर देशात पुन्हा निवडणूका होतील आणि लोकशाही व्यवस्था टिकेल असे वाटत नाही असे त्यांनी सांगितले.मला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी बोलेल असा इशारा त्यांनी दिला. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आता वाघाचा मुका घेत असून देशात जनतेपासून दूर गेलेल्या भाजप शिवसेना पक्षाला एकएकटे लढून सत्ता मिळणार नाही त्यामुळे भाजप शिवसेना एकत्र झाले आहे. भाजपला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा प्रश्न बाहेर काढून धर्मात धर्मात लढाई निर्माण करण्याचा डाव असून भाजपला ‘राम मंदिर बनाना नही, सत्ता बनानी हैं अशी बोचरी टीका करत देशातील सुशिक्षित जनतेला पुन्हा फसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आपल्याला लोकशाहीवर विश्वास असलेले सरकार बसवून ठोकशाही करणारे सरकार पायउतार करावे लागेल असे भुजबळ म्हणाले .

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी वेगळा मानतच नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी हे एकाच विचारांवर चालणारे पक्ष असून ते  एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन पक्षांची बांधणी करावी आणि आगामी लोकसभेची निवडणूकी बरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निवडणूक आण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी कॉंग्रेस कमिटी कार्यालयात भेट देवून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधानाला मानणारे आणि हुकूमशाहीला विरोध करणारे पक्ष आघाडीसोबत येत आहे. देशभरात भाजपला सत्तेतून घालून लावण्यासाठी देशभरात विविध राज्यात आघाडी केल्या जात आहे. नक्कीच निवडणुकीत आघाडीला यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  बूथ कमिट्या तयार झाल्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे गावागावातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गावपातळीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

 राजकारणात पक्ष येतात आणि जातात मात्र आताची जी परिस्थिती आहे याचा विचार सुद्धा आपण केलेला नसेल असे दादागिरी, गुंडगिरी आणि दबावतंत्र निर्माण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय सारख्या शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून कॉंग्रस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात अशी व्यवस्था बघितली नाही.  पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सभागृहात यायचे तेव्हा विरोधी पक्षातील लोकांना नमस्कार करून नंतर आपल्या लोकांना नमस्कार करायचे ही लोकशाहीची शिकवण आहे. लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षांनी भूमिका महत्त्वाची असते मात्र सद्याच्या सरकारला विरोधी पक्षच नको आहे असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह देशातील महान व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही भुजबळ म्हणाले.

 

 

Previous articleराहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारली
Next articleउपसभापतीपदी नीलम गोऱ्हे की अनिल परब ?