पाच वर्षात केले नाही ते पाच मिनिटांत कसे होईल?

पाच वर्षात केले नाही ते पाच मिनिटांत कसे होईल?

मुंबई नगरी टीम

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकासकामांचा धडाका लावला आहे.अवघ्या सहा दिवसात वीस उद्घाटनांच्या फीती फडणवीस यांनी कापल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच वर्षात केले नाही ते पाच मिनिटांत कसे होईल,असा टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,कुठे स्थानिकांचा विरोध तर कुठे प्रक्रिया अर्धवट तर कुठे चौथ्यांदा भूमीपूजन. सहा दिवसांतील वीस उद्घाटनांची ही सत्यकथा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काळजी करू नये. पाच वर्षात जे केले नाही ते पाच मिनिटांत कसे होईल,असा जोरदार टोला सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी सरकारने उद्घाटनांचा सपाटा लावला आहे.यातही अनेक गैरप्रकार होत असून काही प्रकल्पांचे उद्घाटन चौथ्यांदा झाले आहे. दोन प्रकल्पांची फीत दोन वेळा कापली गेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस फार चौकशी न करताच उद्घाटने करत सुटले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पाच वर्षात सरकारने काहीही केले नाही. मात्र आता पाच मिनिटांत उद्घाटन उरकून काही उपयोग नाही,असे सुळे यांना म्हणायचे आहे. येत्या दोन दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून सरकारची लगीनघाई सुरू आहे.

 

 

 

Previous article९२ वर्षाचा असलो तरीही  रावसाहेब दानवेंविरोधात लढेन
Next articleसुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित