भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देणार : पवार

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देणार : पवार

मुंबई नगरी टीम

सोलापूर :  युवा सेनेचेप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणारी महाजनादेश यात्रा, यामुळे  राज्यात  विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचे वातावरण असतानाच आता त्यामध्ये आश्वासनांची भर पडण्यास सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार यांनी दिले आहे.

शिवसेनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने तर सर्वात आघाडी घेत इच्छूकांच्या मुलाखतीचा सपाटा लावला असल्याने राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाल्याची चर्चा आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या निमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज  सोलापुरात होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जमनमोहन रेड्डी यांनी   आंध्र प्रदेशात स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राज्यात भूमीपुत्रांना खासगी नोक-यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देवू असे आश्वासन दिले आहे.  यासाठी कायदाही केला जाईल, असे ते म्हणाले.

 

Previous articleपंकजाताईंच्या वाढदिवसाला गावे हायमास्ट दिव्यांनी उजळली
Next articleहे सरकार आहे की कुंभकर्ण ?  : अशोक चव्हाण