या पुढे मी निवडणूक लढवणार नाही
मुंबई नगरी टीम
वसई : विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला काही अवधी शिल्लक राहिला असतानाच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आज सर्वांना धक्का दिला आहे. ही माझी शेवटची निवडणूक आणि या पुढे मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे.
ही माझी शेवटची निवडणूक आणि या पुढे मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा वसईचे विद्यमान आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी आज वसईमध्ये पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली विशेष म्हणजे त्यांनी मतदानाच्या दुस-या दिवशी ही घोषणा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.वसईची होणारी बदनामी मला आवडत नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेली बदनामी अती झाली असे त्यांनी सांगितले. यापुढे केवळ पालघरच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते निवडणुकीचे निकाल काही लागो याची चिंता मला नाही.यापुढे मी गावो गावी फिरणार असून येथील जनतेला एक वेगळा हितेंद्र ठाकूर दिसेल असेही ते म्हाणाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली.राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते ते मी या निवडणुकीत शिकलो असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर भाष्य केले. मी या निवडणूकीत किमान ५० हजार मतांनी जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसेच नालासोपारा आणि बोईसर मध्ये सुद्धा आम्हीच जिंकणार असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्ता हा माझा देव आहे आणि आमचा सक्षम कार्यकर्ता हा आमचा पुढचा आमदार असेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.