दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई ‌: १५ अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच स्पष्ट केले असतानाच आज रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळवता आले नाही; तर राज्यातील काही खात्रीशीर मतदारसंघात भाजपाला स्वीकारावा लागलेला पराभव आणि बंडखोरांमुळे पक्षाचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संपर्कात १५ अपक्ष आमदार असल्याचे सांगितले होते.तर दुसरीकडेच शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी अटी घातल्या असतानाच आज रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. नरेंद्र भोंडेकर आणि आशिष जयस्वाल हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.

Previous articleधनंजय मुंडे झाले गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक
Next articleशिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम ; भाजपाला खिंडीत गाठण्याच्या हालचाली