खडसेंच्या कन्येचा पराभव करणा-या आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

खडसेंच्या कन्येचा पराभव करणा-या आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई नगरी टीम

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जळगाव मधिल मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातुन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव करणारे अपक्ष आमदार  चंद्रकांत पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून  शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ६३ झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये आपले वजन वाढावे यासाठी दोन्ही पक्षांकडून आपापले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून पराभव करणारे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने  शिवसेनेचे संख्याबळ आता ६३ वर गेले आहे.धुळे जिल्हा साक्रीच्या अपक्ष आमदार  मंजुळा गावित,जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रहार संघटनेचे  अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे अपक्ष आमदार  राजकुमार पटेल ,नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जैस्वाल , भंडा-याचे अपक्ष आमदार  नरेंद्र भोंडेकर,नेवासाचे अपक्ष आमदार  शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

Previous articleभाजपाला  अपक्षांसह १३ आमदारांचा पाठिंबा
Next articleएकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ ?