भाजपाला  अपक्षांसह १३ आमदारांचा पाठिंबा

भाजपाला  अपक्षांसह १३ आमदारांचा पाठिंबा

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेनेला ७ अपक्ष आमदारांनी पाठिंबा जाहीर केला असतानात दुसरीकडे विविध छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून भाजपाला पाठिंबा देवून अनेक विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मनोदय यावेळी सर्वांनी बोलून दाखविला त्यामुळे आता भाजपाचे संख्याबळ १२० वर गेले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित विधानसभेत ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर (नालासोपारा), शेकापचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे (शाहूवाडी), अपक्ष आमदार रवी राणा (बडनेरा), संजय मामा शिंदे (करमाळा),गीता जैन (मीरा भाईंदर), महेश बालदी (उरण), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र राऊत (बार्शी), प्रकाशअण्णा आव्हाडे (इचलकरंजी) यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.पाण्याचे विविध प्रश्न, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, राज्य सरकारच्या वतीने मदतीसाठी घेतलेला पुढाकार इत्यादी अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मनोदय यावेळी या आमदारांनी बोलून दाखविला.

Previous articleसत्तेचे समान वाटप झाल्यास महाराष्ट्रात स्थिर सरकार
Next articleखडसेंच्या कन्येचा पराभव करणा-या आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा