दादा… कुटुंबात फाटाफूट नको उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे; सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन
मुंबई नगरी टीम
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपाला साथ दिल्यानंतर त्यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे या वाद मिटविण्यासाठी पुढे आल्या आहेत. दादा.. सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काही पण कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.
अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घटचनाक्रमामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपांचा धक्का बसला आहे तर अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे.त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या बंधूंच्या घरी मुक्कम ठोकला होता तर शरद पवार दिवसभर पक्षांची घडी बसवत होते. तर अजित पवार यांच्या बंडामुळे खा. सुप्रिया सुळे भावनिक झाल्या होत्या. अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांनी परतण्याची विनंती केली आहे. आपल्या पवार कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास राज्यातील जनतेला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको.दादा… तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा आपल्या राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे.परंतु सुप्रिया सुळे यांच्या आवाहनाला अजितदादा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.