वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही : प्रविण दरेकर
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईतील वाडीया रुग्णालय बंद पडण्याच्या स्थितीत आहे.या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
वाडीया रुग्णालयासाठी सुमारे २५० कोटीचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, यासदंर्भात आज आपण वाडीया रुग्णालयाच्या सी.ई.ओ. डॉ.मिनी बोधनवाला यांची भेट घेतली. वाडीया रुग्णालयाची स्थिती समजून घेतली हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपण स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
वाडीया रुग्णालयाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयामध्ये लक्ष घातले असून या सदंर्भात मुख्यमंत्र्याशी लवरकच चर्चा करण्यात येईल असेही दरेकर यांनी सांगितले. या प्रसंगी आमदार रमेश कदम, आमदार कालिदास कोळबंकर आदी मान्यवर उपस्थित होते.