राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे उद्या मंगळवारी इंदू मिलमध्ये होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी करणार आहेत.त्याच्या समवेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, उपस्थित राहणार आहेत.

युती सरकारच्या कार्यकाळात दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या स्मारकाच्या कामात फारशी प्रगती झाली नाही.राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येताच या स्मारकाच्या उभारणीसाठी विशेषत: राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी करीत आढावा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या दुपारी या स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी करणार आहेत त्याच्या समवेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, उपस्थित राहणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अजित पवार यांनी या जागेची पाहणी शरद पवार करणार असल्याचे जाहीर केले होते.

Previous articleअण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारके उभारणार
Next articleसर्वसामान्य नागरिकांना दिलासा : आता आयुक्त कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष”