पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय

मुंबई नगरी टीम
मुंबई : पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणा-या भाजपाच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी टिका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले असून राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Previous articleकर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश
Next articleएकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही