एका महिन्याचे कर्जांचे हप्ते स्थगित करा : नवाब मलिक यांची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : घरे, छोटे व्यवसाय, ऑटो रिक्षा इत्यादींसाठी घेतलेल्या कर्जावरील बँकांचे हप्ते सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महिन्यांसाठी स्थगित केले जावेत अशी  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पेमेंट्सचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे आणि आरबीआयने बँकांना त्वरित तसे करण्याची सूचना केली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.शिवाय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रिलीफ पॅकेजने शहरी, गरीब आणि असंघटित कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असेही  मलिक यांनी ट्वीट करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Previous articleखासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत :  मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Next articleलॉक डाउनच्या काळात दारु विक्री करणा-यांवर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई