मुंबई नगरी टीम
मुंबई :राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यात येत्या १४ एप्रिल पर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र टाळेबंदी केव्हा उठविण्यात येणार हे अनिश्चित असले तरी आता मंत्रालयात पुढील काही महिने सर्वांनाच मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे.देशात आणि राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात येत्या १४ एप्रिलप्रर्यंत टालेबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असे अगोदरच सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. ही टाळेबंदी केव्हा उठविणार हे अनिश्चित असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून यापुढे राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात यापुढील काही महिने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या व्यक्तींना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून या सूचनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी पालन करून मंत्रालयात मास्क लावूनच प्रवेश करावा अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.