गावी जायचे आहे.. आता  आपल्या जिल्ह्याची लिंक ओपन करा आणि माहिती भरा

 मुंबई नगरी टीम

मुंबई :राज्य सरकारने परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेल्या कामगार,विद्यार्थी,पर्यटक यांना त्यांच्या राज्यात जाण्यास आणि दुस-या राज्यात अडकलेल्यांना महाराष्ट्रात परतण्यास परवानगी दिली आहे. तसेच काही कामगार,विद्यार्थी,पर्यटक राज्यातील विविध जिल्ह्यात अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी एका अर्जाद्वारे माहिती पूर्ण भरून देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र ही प्रक्रिया किचकट असल्याने नाराजीची सुर होता. दुस-या जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मुळ जिल्ह्यात परतण्यासाठी आता सोईचे ठरणार आहे. कारण राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या अर्ज भरण्याच्या लिंक्स तयार केल्या आहेत. आता आपणास अर्ज तयार करून संबंधित अधिका-यांकडे घेवून जाण्याची गरज नाही. तर आता घर बसल्या आपणास ज्या जिल्ह्यात जायचे आहे.त्या जिल्ह्याची  लिंक ओपन करून संपूर्ण माहिती भरायची आहे,त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधावा लागणार आहे.मात्र राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

राज्य सरकारने या मध्ये सुलभता यावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यांसाठी लिंक्स तयार केल्या आहेत. काल रात्री उशीरा पर्यंत १७ जिल्ह्यांच्या लिंक्स तयार करण्यात आल्या असून,उर्वरीत लिंक्स आज दुपार पर्यंत तयार करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे.अशा लिंक्स तयार झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल असेही या अधिका-याने सांगितले. महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना  रेल्वे स्थानकापर्यंत  आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही,तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

संबंधित लिंकवर पूर्ण माहिती भरावी.सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा,राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा, राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरुंनी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा
https://t.co/sCgFrD8WMA लिंकवर माहिती भरावी
जालना
जालना जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या विस्थापीत कामगार,पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/90qZ4k5tfo या लिंक वर माहिती भरावी.
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार , पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/53l8GUTYTK या लिंक वर माहिती भरावी. तसेच इतर राज्यात,जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक,यात्रेकरू,कामगार,इतर यांना उस्मानाबादमध्ये येण्याकरिता वरील लिंकवर माहिती भरावी.
नंदूरबार
नंदूरबार जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/bUz9eNbv4s या लिंक वर माहिती भरावी. तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक,विद्यार्थी,यात्रेकरू
कामगार,इतर यांनी या लिंक वर माहिती भरावी.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयात यायचे असेल तर खालील लिंकवर नोंदणी करावी. https://t.co/4ps5dTrWgj आपण त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस स्टेशन यांचेकडे परवान्यासाठी संपर्क करावा. व तसेच परवानगी , पास घेऊनच प्रवास करावा.
धुळे
धुळे जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  मजूर,कामगार,पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/AgEOEyMF4p या लिंकवर माहिती भरावी. माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा,राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल व त्या जिल्हा/ राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
यवतमाळ
यवतमाळ जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार,पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/WfbKr8SwjY या लिंकवर माहिती भरावी.तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक,विद्यार्थी,यात्रेकरू,
कामगार,इतर यांना येण्याकरिता https://t.co/xS5bhE54hc   या लिंक वर माहिती भरावी
रायगड
रायगड जिल्हयातून बाहेर राज्या मध्ये जाणाऱ्या  कामगार , पर्यटक, भाविक , विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/NeZezy6ga1 या लिंक वर माहिती भरावी.सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा च राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा, राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
अकोला
अकोला जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  मजूर/कामगार ,पर्यटक ,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/yYJU8A6ydC या लिंकवर माहिती भरावी.सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा ,राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा/राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
वाशिम
वाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व वाशिम जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/bK4W6PsoAd या लिंक वर माहिती भरावी.माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा,राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल.
हिंगोली 
हिंगोली  जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला आज रोजी हिंगोली  जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
अमरावती
अमरावती जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व अमरावती जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/CcSzWib3xw  किंवा  https://t.co/xoaGiiRfnk या लिंक वर माहिती भरावी.सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क
गोंदिया 
गोंदिया https://t.co/vVo8DJqACl Marathi Link (मराठीमध्ये माहिती भरण्यासाठी)https://t.co/DenFMCGQdM गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय/रोजगार,शिक्षण,नोकरी व इतर कामानिमित्त इतर राज्य,जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांनी वरील लिंकद्वारे माहिती भरून संबंधितांशी संपर्क करावा.
बुलढाणा
बुलढाणा जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व बुलढाणा जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार ,पर्यटक , भाविक , विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/X6hkDd2D4g या लिंक वर माहिती भरावी.माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा ,राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल.
अहमदनगर
अहमदनगर जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार, पर्यटक, भाविक , विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://t.co/qxZe13ebYo या लिंक वर माहिती भरावी.तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक,विद्यार्थी,यात्रेकरू,
कामगार यांनी माहिती भरून पाठवायची आहे.
नाशिक
नागपूर
from Nagpur. Fill in your information accurately in the form provided for you to return to your home district. Collector Office #Nagpur) https://t.co/CSfPJASnmt You can also access this link by visiting: https://t.co/SjxCtiaXaV
Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा; येत्या २१ मे रोजी निवडणूक
Next articleवाचा : लॉक डाऊन मध्ये कोणती दुकाने,व्यवयाय सुरू करण्यास परवानगी आहे