राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई,पुणे,नाशिक आदी महानगरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने राज्यात येत्या ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात यावा यावर आज झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत एकमत झाल्याचे समजते. राज्याचा अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबतची या बैठकीत चर्चा  झाली असल्याचे सागितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी लॉकडाउन वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मुख्य सचिव अजॉय मेहता,मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.लॉकडाउन आणि राज्याचा अर्थव्यवस्थेचा गाडा कसा रुळावर आणता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर या बैठकीत एकमत झाले असल्याचे समजते.केंद्र सरकार लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती  जाहीर करेल त्यानंतरच राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीत या पुढील काळात झोननुसार कोणत्या गोष्टी सुरु करता येतील यावर चर्चा झाली.कोरोनामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती,त्या समितीच्या अहवालावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजते. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील विविध उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Previous articleमाझ्या मुलीला जबरदस्तीने विधानसभेचे तिकीट का दिलं ?
Next articleउद्धव ठाकरे आमदार झाले ; ९ उमेदवारांची बिनविरोध निवड