लॉकडाऊनमध्ये आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात २८ हजार ३३७ रिक्त पदांसाठी भरती

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यभरातील आरोग्य विभागातील १७ हजार ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे तसेच राज्यातील विविध महानगरपालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून,लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत.आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता इतर विभागातील भरतीवर सध्या स्थगिती आहे. त्यामुळे सध्या राज्यात असणा-या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य विभागातील सुमारे १७ हजार ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे अशी एकूण २८ हजार ३३७ रिक्त पदे तसेच राज्यातील विविध महानगरपालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून, लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात आहे असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री  टोपे यांनी सांगितले.

 आरोग्यमंत्री  टोपे यांच्या या घोषणेमुळे राज्यात असणा-या बेरोजगार तरूणांना मोठा दिलासा मिळणार आहे.विशेष म्हणजे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदे भरतानाच राज्यातील विविध महानगरपालिकांमधील असणारी रिक्त पदे शंभर टक्के भरण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे ही पदे लॉकडाऊनच्या काळात भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असल्याने याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.

Previous articleराज्यात आज कोरोनाचे १५७६ नवीन रुग्ण; ४९ रुग्णांचा मृत्यू
Next articleमहाराष्ट्रातून आजपर्यंत “एवढे” परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत गेले !