रेकॉर्ड ब्रेक : आजच्या दिवशी एवढ्या तळीरामांना घरपोच दारू विक्री करण्यात आली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात मद्यविक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानापैकी  ५ हजार ९७५ दुकाने सुरू असून,राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री सुरू करण्यात  आली आहे.आज दिवसभरात तब्बल ३० हजार ६२४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आली आहे.

३ मे पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे.मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात सशर्त दुकाने सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री सुरू करण्यात  आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. आज एका दिवसात  ३० हजार ६२४ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक,लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक,निरीक्षक,दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता शंभर रूपये तर  आजीवन परवान्याकरीता १ हजार एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणा-या दुकानांसमोर गर्दी न करतामद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

२४ मार्च पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करीरोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनीनाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी,कर्मचारी तैनात आहेत.काल २१ मे रोजी राज्यात ८३ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ३८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २८ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२४ मार्च पासुन २१ मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यातएकूण ६ हजार ६७  गुन्हे नोंदविण्यात आले असून २ हजार ७०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६०६ वाहने जप्त करण्यात आली असून १६ कोटी ४५ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous articleबापरे…राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढली; आपल्या जिल्ह्यात किती रूग्ण संख्या वाढली ?
Next articleतळीरामांना खुशखबर : मुंबईत आजपासून घरपोच मद्यविक्री सुरू होणार