राजू शेट्टींच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !

मुंबई नगरी टीम

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून,राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर पाठवायच्या जागेवयार राजू शेट्टी यांच्या नावावर आजच्या भेटीत शिक्कमोर्तब करण्यात आल्याचे सागण्यात येते.

विधान परिषदेतील रिक्त झालेल्या १२ राज्यपाल नियुक्त जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.यापूर्वी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेवून चर्चा केली होती. त्यानुसार राजू शेट्टी यांनी आज पवार यांची भेट घेतल्याने राश्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित झाली असल्याचे समजते.विधान परिषदेच्या १२ जागांपैकी सत्ताधारी पक्षांना प्रत्येकी ४ जागा वाट्याला येणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणा-या ४ जागांपैकी एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देणार असल्याची चर्चा होती.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दौ-यात राजू शेट्टी यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली होती.आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील घरी आले होते, असे शेट्टी यांनी सांगून या भेटीत विधानपरिषदेच्या नियुक्तीबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले होते.

Previous articleप्रवाशांना दिलासा : एसटीच्या मासिक,त्रैमासिक पासला मिळणार मुदतवाढ
Next articleलॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प