मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका,परिसेविका व वर्ग-४ संवर्गातील पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका, परिसेविका व वर्ग-४ संवर्गातील पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.त्यानुलार परिसेविकांची ११ पदे,अधिपरिचारिकांची १०४ पदे व वर्ग-४ संवर्गातील १११ पदे अशी एकूण २२६ पदांच्या सेवा बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यासाठी ५ कोटी ९६ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.अधिपरिचारिका व वर्ग-४ या संवर्गातील पदांच्या सेवा ८ महिन्यांकरीता (दिनांक १ मे २०२० ते ३१ डिसेंबर २०२०) बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्यास अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येणार आहे.त्यानुसार परिसेविकेची रिक्त ११ पदे अधिपरिचारिकांची रिक्त ४३ पदे,अधिपरिचारिकांची ६१ पदे व वर्ग-४ संवर्गातील १११ ही नवीन पदे ८ महिन्यांकरीता निर्माण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ही सर्व पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहेत.