मुंबई नगरी टीम
मुंबई : परिक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वत:ला खचितच समाधान लाभणार नाही असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परिक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परिक्षा घेणे शक्य आहे,असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती.तर परिक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वत:ला खचितच समाधान लाभणार नाही असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परिक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परिक्षा घेणे शक्य आहे,असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे.कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा.आयआयटी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाइन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे.मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक आहे, असेही मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्याऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून उदघाटन करताना राज्यपाल बोलत होते.
कालप्रवाहानुसार अनेक गोष्टी बदलत असतात परंतू अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात, असे सांगून नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत असेही मत राज्यपालांनी यावेळी मांडले.लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहान्यांच्या अध्यापनासाठी ऑनलाइन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही मत राज्यपालांनी व्यक्त केले. ऑनलाईन अध्यापन साधने व त्यांचे उपयोग‘, ‘उत्तम शैक्षणिक सामग्रीची निर्मिती‘, ‘विद्यार्थी सुसवांद व सहअध्ययन‘ या विषयावरील या तीन दिवसांच्या कार्यशाळेला देशभरातून ६ हजार शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती अकादमीस्थान फाऊंडेशनचे संस्थापक व मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरील कुलपतींचे सदस्य दिपक कुमार मुकादम यांनी दिली.