शिक्षण क्षेत्रात “या” कारणास्तव महाराष्ट्र ठरले एकमेव राज्य

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना संकटामुळे अनेक क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागत असतानाच राज्याच्या शिक्षण विभागाने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु केले आहेत.यांमध्ये चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू केले असल्याने असे शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

इयत्ता ३ री ते इयत्ता १२ वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल्स सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये चार माध्यमातील शैक्षणिक चॅनेल्स आहेत.इयत्ता पहिले ते इयत्ता १० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगून असे चॅनेल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक 

राज्यात कोरोनाचे संकटात वाढतच असून,कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे.सध्याची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतले जाणार आहेत.. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक ट्विट करून जाहीर केले आहे.राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे वेळापत्रक जाहीर

  • पूर्व प्राथमिक (बालवाडी)- सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या वेळेत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण जाईल.
  • तिसरी ते आठवी –  प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतले जाणार आहेत.
  • नववी ते बारावी- प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे चार सत्रे घेतली जाणार.
Previous articleदणका : समाज माध्यमावरील फेक फॉलोअर्स प्रकरणाची चौकशी होणार
Next articleसरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान