बाईकवर डबल सीटला परवानगी; राज्यात काय सुरू काय बंद ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढविल्यानंतर राज्य सरकारने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊन जाहीर करताना शिथिलताही देण्यात आली आहे.त्यानुसार येत्या ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही.यापूर्वी दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.आता नव्या नियमानुसार दुचाकीवर डबल सीट प्रवास करता येणार आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी राज्य सरकाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.त्यानुसार राज्यात येत्या ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास  परवानगी दिली नाही.होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे. ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नाही म्हणजेच मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम गोल्फ अशा खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे दिचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

वाचा : राज्यात काय सुरु काय बंद राहणार

  • ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणार
  • मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी
  • ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी
  • मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार
  • सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार
  • टॅक्सी, कॅब,चारचाकी वाहनामध्ये केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक आणि ३ प्रवाशांना प्रवासाची परवानगी
  • रिक्षा मध्ये पूर्वी प्रमाणेच चालक आणि २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे
  • दुचाकीवर चालक आणि एक प्रवासी असा प्रवास करता येईल
Previous article३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला ; जिम,योग संस्था सुरू होणार
Next articleवाचा : अनलॉक ३ साठी केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन मार्गदर्शक तत्वे