३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला ; जिम,योग संस्था सुरू होणार

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या लागू असलेला लॉकडाउन येत्या ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक ३ च्या मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत त्यानुसार रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली असून,योग संस्था आणि व्यायामशाळा येत्या ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

देशात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने येत्या ३१ जूलै पर्यंत असलेला लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ३ च्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत.कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. तर सध्या असणारी रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे.सोबतच योग संस्था आणि व्यायामशाळा येत्या ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.या निर्णायामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अनलॉक ३ च्या मार्गदर्शक सूचना

  • योग संस्था आणि व्यायामशाळा  येत्या ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.सामाजिक अंतराचे पालन सोशल, तसेच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून  निर्देश देण्यात येणार आहेत.
  • शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
  • रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय. या निर्णायामुळे रात्री फिरण्यावरील निर्बंध हटले आहेत.
  • सामाजिक अंतराचे पालन आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी
  • शाळा कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
  • आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी.
  • कंटेनमेंट झोन आणि बाहेरही मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, बार, सभागृह बंदच राहणार
  • सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • याशिवाय आंतरराज्य आणि राज्यांतर्गत लोकांच्या प्रवासावर व मालवाहतुकीवर निर्बंध नाही. यासाठी वेगळी परवानगी किंवा ई-परमिटची गरज नाही.
Previous articleदिलासा :  राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर
Next articleबाईकवर डबल सीटला परवानगी; राज्यात काय सुरू काय बंद ?