मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्र सरकारने अनलालॉक ४ च्या मार्गदर्शक सूचना जारी करीत आहे.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील टाळेबंदीची मुदत आज संपत असून, पुनश्च हरिओम ४ च्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक बोलावली असून, राज्यात ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही असे या मध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यातील टाळेबंदीची मुदत आज संपत असून,पुनश्च हरिओम ४ च्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या जाण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.या बैठकीत राज्यातील प्रवासासाठी ई-पासची अट सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात एसटीने प्रवासची मुभा देण्यात आली आहे.यासाठी ई-पासची आवश्यकता नाही मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पासची बंधनकारक करण्यात आल्याने राज्यातील जनतेत नाराजी आहे.
जनसामान्यांकडून ई-पासची अट रद्द करण्याची मागणी केली जात आहे.या पार्श्वभूमीवर होणा-या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव आदी अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या बैठकीत मार्गदर्शक सूचनावर शिक्का मोर्तब केला जाणार आहे.तसेच राज्यातील ई-पासची अट रद्द केली जाणार का याकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.