१८०० रूपयांसाठी वाद घालणा-या काकूंच्या ‘त्या’  व्हिडिओची मंत्र्यांनी घेतली दखल !

मुंबई नगरी टीम

मुंबई : एका तरुणासोबत १८०० रुपयांसाठी वाद घालणा-या घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काल समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दाखल घेतली आहे.आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.

काल समाज माध्यमात एक घरकाम करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.या व्हिडीओ ती महिला एका तरुणाला तिच्या कामाचे १८०० रुपये मागत आहे.तो तरुण तिला १८०० रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही त्या काकू ऐकायला तयार दिसत नाहीत. त्या व्हिडिओतील तो तरुण महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि एक शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिले असल्याचे सांगत आहे.हे या महिलेला सुद्धा हे मान्य आहे. मात्र तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत.मात्र, मला माझे १८०० रुपये हवे आहे.यावर हा तरूण १८०० रुपये दिल्याचे जीव तोडून सांगत आहे मात्र काकू काही ऐकायला तयार नाहीत.

या व्हिडिओची दखल मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे.मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत.अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.तर या व्हिडीओचा वापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी केला आहे.युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर करीत, घसरलेल्या जीडीपीवर निशाणा साधला आहे. तर हाच व्हिडिओ रिट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील विरोधीपक्षांवर निशाणा साधला आहे.

Previous articleई-पास सुरू राहणार की बंद होणार ? आज राज्य सरकारच्या गाईडलाइन्स जारी होणार
Next articleमंदिरांची टाळी उघडायला हवीत,पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत! सामनातून फडणवीसांवर घणाघात