मंदिरांची टाळी उघडायला हवीत,पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत! सामनातून फडणवीसांवर घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने नुकतेच घंटानाद आंदोलन केले.या आंदोलनाचा समाचार सामन्याच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.मंदिरांची टाळी उघडायला हवीत,पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत.आधी लोकांना जगवा,मग पुढचे पुढे! असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावण्यात आला आहे.

राज्यात असलेल्या कोरोनाच्या संकटात मंदिरे खुले करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे.यासाठी राज्यात भाजपने घंटानाद आंदोलन केले.विरोधी पक्षाच्या या आंदोलनाचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे!लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय ? असा सवाल या करण्यात आला आहे.धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.त्याचा समाचार या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. भाजपतर्फे  घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे असा टोलाही लगावण्यात आला आहे.मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर  विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे असा टोलाही लगावला आहे.

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने काल सर्वत्र घंटानाद केला.कुठे थाळीनाद केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अशी टीकाही यामध्ये करण्यात आली आहे.या प्रश्नावरून प्रकाश आंबेडकरएमआयएमचे खासदार जलील यांचाही समाचार घेण्यात आला आहे. जेथे शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडली तेथे कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. तिरुपती बालाजी मंदिराला याचा फटका बसला आहे. राममंदिर भूमिपूजन सोहोळ्यानंतर मुख्य महंतांसह अनेकांना लागण झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय असाही सवाल या अग्रलेखातून करण्याच आला आहे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधना देखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय असा सवाल उपस्थित करीत, मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत अशी टीका विरोधकांवर करण्यात आली आहे.

Previous article१८०० रूपयांसाठी वाद घालणा-या काकूंच्या ‘त्या’  व्हिडिओची मंत्र्यांनी घेतली दखल !
Next articleपंतप्रधान मोदींची “मन की बात” जनतेला खटकली,व्हिडीओवर पडला डिसलाईकचा पाऊस