सोशल डिस्टंन्सिंगच्या नावाखाली धर्म,संस्कृती,व्यवसायिक,सगळंच उध्वस्त करणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : सोशल डिस्टंसिन्गच्या नावाखाली धर्म, संस्कृती, श्रध्दास्थाने आणि त्यावर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसायिक या सगळ्याच गोष्टी पूर्णपणे उध्वस्त करणार का ? मग अर्थव्यवस्थेचे काय ? असा खडा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सरकारला विचारला आहे.सरकारच्या चर्चेवर जनतेचा विश्वासच उडाला आहे.त्यामुळे जनता कायदा हातात घेऊन स्वतःच न्याय मिळवतील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंढरपुराचे विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केलेल्या आंदोलनाचेही दरेकर यांनी स्वागत केले आहे.

पंढरपुरातील वंचित आघाडीच्या आजच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, ‘मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडावीत यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला होता. भारतीय जनता पार्टीनेही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. आज तीच मागणी घेऊन पंढरपुरात विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी खुद्द प्रकाश आंबेडकर आंदोलन करत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे.आरोग्याची स्थितीची जाणीव करून देणाऱ्यांना मला हे विचारायचे आहे की, कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये आपण पुर्णपणे कमी पडलेलो आहोत याची जबाबदारी कोण घेणार ? तसेच चर्चेचे आवाहन शिवसनेचे नेते संजय राऊत करत आहेत, पण सरकारशी चर्चा करून काही निष्पन्न होईल यावर जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही. तसेच चर्चेला सरकारने मातोश्रीच्या बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. पण ते पडतील का ? यावर गेल्या अनेक महिन्यात लोकांच्या मनात विश्वास नाही. त्यामुळे शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सर्वांत मोठा अधिकार आहे आणि त्यानुसार आज प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleसंदीप सिंह-भाजप-ड्रग डील कनेक्शनची सखोल चौकशी करा!
Next articleखुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार