मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई सारख्या शहरात आपल्या स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येक सामान्य नागरिकाचे स्वपन असते. अनेकांना आपले हे स्वप्न पूर्ण करण्यास अडचणी येतात. मात्र ही अडचण आता म्हाडाकडून दूर केली जाणारा आहे. म्हाडा लवकरच मुंबई आणि ठाण्यात परवडणारी घरे उभारणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरातील गोरगरिबांना परवडणारी घरे मिळावीत,असा म्हाडा स्थापन करण्याचा उद्देश होता. या अंतर्गत कन्नमवार नगर,अभुदय नगर, आदर्श नगर अशा अनेक प्रकल्पांची निर्मिती झाली. यामध्ये लोकांना परवडणारी घरे मिळाली. पण १९८० च्या दशकानंतर एकही असे नगर बनवू शकलेले नाही. म्हाडाची जी मूळ उद्धिष्ट आहेत ती पूर्ण केली पाहिजेत. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. चर्चा करून परवानगी घेणार आहे. ते याला परवानगी देतील, असा विश्वास मला आहे.
काही जमिनी आहते ज्या वादात अडकल्या आहेत. ज्या न्यायालयात आहेत. त्या जमिनी जर म्हाडा विकत घेऊ शकली. ती विकत घेऊन जर म्हाडा घरे देऊ शकली. तर बिल्डर जिथे ८ हजाराने घर विकतो. तिथे म्हाडा ते साडे चार पाच हजाराला विकू शकेल. पवईत एका घरामागे दीडशे अर्ज म्हाडाकडे येतात. खासगी बिल्डरला एक घर विकताना अडचणींना तोंड द्यावे लागते. लोकांचा प्रचंड विश्वास म्हाडावर आहे. म्हाडाने जर हे काम केले तर त्याचा मूळ उद्देश सफल होईल”, अशी माहिती यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.