महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. देशासह राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. त्यात राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. गुरूवारी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की,त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी सुरक्षित राहा आणि काळजी घ्या”, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणीझिटिव्ह आली असून त्या सध्या उपचार घेत आहेत. यासह गेल्या आठवड्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली. कोणतीही लक्षण नसल्याने ते सध्या पुण्यात घरीच होम क्वारंटाईन आहेत. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच कोरोनावर मात केली  आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Previous articleमहाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले
Next articleट्रेंड झालेल्या हॅशटॅगवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची नाराजी