मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थांनी एसईबीसी मध्ये जे परिक्षेसाठी अर्ज केले होते. त्यांचे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण काढुन मराठा समाजाच्या विद्यार्थांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस बदल करण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र त्यांची मुदत आज १५ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थीं सध्या संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे एसईबीसी च्या जाहिरीती मधील आरक्षण वगळून मराठा समाजाचे आरक्षण वगळण्याचा सरकारचा डाव, असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
मराठा आरक्षाणावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झाल्या.अनेक मराठा नेत्यांनी सरकारकडे आरक्षणा संदर्भात निवेदन दिले. या मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकाही झाल्या. परंतु त्यावर कोणताही निर्णय होत नाही, त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असा आरोप दरेकर यांनी केला. यासंदर्भात दरेकर यांनी सांगितले की, राज्यात मराठा आरक्षणाला अंतिरम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ कडून प्रकाशित करण्यात आली होती. आज १५ जानेवारी असून त्याबाबत कोणतीही सुचना करण्यात आली नसून विद्यार्थी संभ्रमात आहेत. सरकारने या बाबी स्पष्टीकरण द्यावे जेणेकरून विद्यार्थी या संभ्रमातून बाहेर पडतील, असे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले की, एकीकडे सरकार २५ जानेवारी २०२१ स्थगिती उठवणार म्हणते तर दुसरीकडे आयोगाच्या परिक्षेमधुन मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण नाकारते, यामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ईडब्ल्यूएस मध्ये १३ टक्के जागा मिळणार का ? वयोमर्यादा शिथिल होणार का ? जर परीक्षा मार्च व एप्रिल मध्ये होणार आहेत मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोषणपत्रात १५ जानेवारीची मुदत का ? विद्यार्थ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी सरकार प्रयत्न करतय का ? असे ठाम सवाल दरेकर यांनी उपस्थित केले.मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचवरील स्थगिती हे सरकार आता उठवणार नाही अशी धारणा आता मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत एक शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात तोडगा काढण्याची विनंती करणार आहे, असे दरेकर यांनी सांगितले.