बापरे ! २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांनी लढवली ग्रामपंचायतीची निवडणूक

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज राज्यातील १२ हजार ७७६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले असून,दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सुमारे ६६ टक्के मतदान झाले आहे.विशेष म्हणजे आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार होते.आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले.येत्या १८ जानेवारीला मतमोजणी आहे.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायती पैकी १२ हजार ७७६ ग्रामपंचायतीसाठी आज काही अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.सरपंचपदाचा लिलाव झाल्यामुळे दोन गावांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या.सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती.दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सुमारे ६६ टक्के मतदान झाले आहे.या निवडणूकीत १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी निवडणूक पार पडली.या निवडणूकीसाठी एकूण ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी ६ हजार २४ अर्ज अवैध ठरले.तर ९७ हजार ७१९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार होते.या निवडणूकीत २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.

Previous articleएमपीएसीच्या जाहिरातमधून एसईबीसी पर्याय वगळून मराठा समाजाचे आरक्षण संपविण्याचा सरकारचा डाव
Next articleधनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची एका आठवड्यात होणार चौकशी