मुंबई नगरी टीम
मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी आपले दौरे रद्द केले होते.विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.राज ठाकरे यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती.राज्यातील महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक पुणे दौरे केले होते.आज भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच त्यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आला आहे.राज ठाकरे आणि त्यांच्या आई या घरीच विलगीकरण होऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांचे स्वीय सहायक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.कोरोना पहिल्या आणि दुस-या लाटेतही राज ठाकरे यांनी मास्क वापरलेला नाही.